अध्यक्षपदाची धुरा दि. ८ ऑगस्ट २०१४ रोजी स्विकारल्या पासून समाजाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत राहणे मी पसंद केले. मध्यवर्ती मंडळामध्ये प्रथमच अध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक मला अभिप्रेत नव्हती. तरी देखील मी तत्वासाठी निवडणुकीला सामोरे गेलो. अखिल समाजाने मला प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. त्याबद्दल मी समाजाचा सदैव ऋणी आहे. मात्र त्याच बरोबर माझी जबाबदारीही वाढलेली होती म्हणून प्रथम निराशेकडे गेलेल्या समाजाला सुस्थितीत आणणे हे मी माझे आद्य कर्तव्य समजून पालघर येथील कॉलेज अद्ययावत करून पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण करून पुर्णत्वाला नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. याकामी मला समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी बहुमोल असे आर्थिक सहकार्य केले आहे. अशा सर्व दानशूराना मी धन्यवाद देतो
अधिक वाचा
Copyright © 2021 and all Rights Reserved by PANCHAL SAMAJ and Developed by DELTASOFT